कारचे उत्पादन करण्यापासून ते बुलेट ट्रेनचे उत्पादन करण्यासाठी एकत्र येण्यापर्यंत भारत व जपान यांनी सहकार्य केल्यापासून या दोन देशांमधील संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
जपानने भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मोदी यांनी जपानच्या कोबे शहरातील भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितले. भारताच्या जगाशी असलेल्या संबंधांचा मुद्दा येतो, तेव्हा जपानचे स्थान महत्त्वाचे ठरते. हे संबंध आजचे नसून अनेक शतकांपासूनचे आहेत. या संबंधांचा पाया एकमेकांच्या संस्कृतीबाबत सामंजस्य आणि आदर हा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
येत्या पाच वर्षांमध्ये ५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे, द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होणार आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.