प्रादेशिक भाषांमध्ये निकाल : आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर केवळ इंग्रजी भाषेतच निकालपत्र अपलोड करण्यात येत होतं. मात्र, हेच निकालपत्र आता मराठी हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल.
हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल हिंदीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यापूर्वीही केली होती. त्यानुसार प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रं उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होणार आहे. सुरुवातीला 500 पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.