ISROच्या केंद्रांची संशोधन आणि विकास कामे व्यावसायिकरित्या चालविण्यासाठी तयार करण्यात आलेली संपूर्ण मालकीचा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम (CPSE) – न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL).
नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातले बदल यांच्या विपरीत प्रभावांना टाळण्यासाठी राज्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेला असा कार्यक्रम, जी प्रथमच भारतातल्या एखाद्या राज्यात जागतिक बँकेची भागीदारी दर्शवते – रेजिलंट केरलाप्रोग्राम.
‘इंडिया मेरीटाइम अवॉर्ड 2019’ मधील ‘बेस्ट पोर्ट ऑफ द इयर (कंटेनराइज्ड)’ या पुरस्काराचा विजेता – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT). अमेझॉन ग्लोबल संस्थेच्या सहकार्याने ट्रायफेड आणि आदिवासी मंत्रालयाने 28 जून रोजी सुरू केलेली मोहिम – गो ट्रायबल मोहीम.
आण्विक इंधनाच्या वापरानंतर निघणार्या कचर्यावर पुनर्प्रक्रिया करून युरेनियम आणि प्लूटोनियम पदार्थांच्या पुनर्प्राप्तीसाठी भारताने स्वीकारलेला उपक्रम – क्लोज्ड फ्युएल सायकल.