हिंदी आणि इंग्रजीप्रमाणेच यापुढे बँक भरती परीक्षा मराठीमध्येही घेतली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत ही घोषणा केली 13 भाषेतून परीक्षा होणार काँग्रेस खासदार जी.सी.चंद्रशेखर यांनी बँकेच्या परीक्षा स्थानिक भाषांमध्ये घ्याव्यात अशी मागणी केली होती.
केंद्र सरकारने या मागणीची दखल घेत बँक भरती परीक्षा 13 भाषेतून घेणार असल्याची घोषणा केली. या भाषांमध्ये होणार परीक्षा बँकांच्या परीक्षा यापुढे मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये होणार आहे.
संधी प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा होत नसल्यानं अनेक पात्र उमेदवार बँकेतील नोकऱ्यांपासून दूर राहतात, असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. आता या निर्णयामुळे प्रादेशिक भाषेतून तयारी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे