ब्रिटनमध्ये चालू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषक 2019 या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बांग्लादेशाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने 2 जुलैला अर्धशतक केले. त्याने आतापर्यंत 4 अर्धशतके आणि दोन शतके केली आहेत.
यासोबतच विश्वचषक स्पर्धेत त्याने 500 धावा पूर्ण केल्या असून यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच त्याने विश्वचषक स्पर्धेत 500 धावा आणि 10 गडी बाद करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातला एकमेव खेळाडू आहे.
शाकिब अल हसन हा जगातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. मॉर्गन, रूट किंवा अॅरॉन फिंच, रोहित शर्मा, वॉर्नर यांना शाकिब अल हसनने मागे टाकले आहे. सध्या त्याने आतापर्यंत 542 धावा केल्या आहेत. तो याबाबतीत दुसऱ्या स्थानावर असून भारताचा रोहित शर्मा 544 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
शाकिब अल हसनने विश्वचषक स्पर्धेत शतक आणि एकाच सामन्यात 5 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी आतापर्यंत फक्त दोन खेळाडूंनी केली आहे, ते म्हणजे भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि युवराज सिंग. त्यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा शाकिब तिसरा खेळाडू ठरला आहे.