विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे. उपांत्य सामन्यासाठी एक दिवस पर्यायी असल्याने आज दि.10 हा सामना जिथे थांबला तिथून पुढे सुरू होणार
पावसामुळे सामना उशीरा सुरु झाल्यास भारतासमोर असे असेल आव्हान :
▪ 46 ओव्हरमध्ये 237
▪ 40 ओव्हरमध्ये 223
▪ 35 ओव्हरमध्ये 209
▪ 30 ओव्हरमध्ये 192
▪ 25 ओव्हरमध्ये 172
▪ 20 ओव्हरमध्ये 148
राखीव दिवशी सामना रद्द झाला तर?
▪ राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघापैकी गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाते. म्हणजेच भारत थेट फायनलमध्ये जाणार
▪ आज पुन्हा पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागणार
फायलन रद्द झाल्यास काय?
▪ सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो
▪ पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते