बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री (RIL) देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरनं घेतलेल्या उसळीनं कंपनीचं बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांच्या पार केलं आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या 2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सरकारी कंपनी इंडियन आईल कॉर्पोरेशन (IOC)ला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्री सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
तसेच पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात विस्तारलेल्या आरआयएलनं वर्ष 2018- 19मध्ये एकूण 6.23 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर आयओसीनं 31 मार्च 2019मधल्या वित्त वर्षात 6.17 लाख कोटी रुपयांचं व्यवहार केला होता. आरआयएलनं आयओसीच्या दुप्पट फायदा कमावून देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.