सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना झालेली चूक आता महागात पडणार. लवकरच सरकार ’इन्कम टॅक्स अॅक्ट’शी संबंधित नियमावलीत करणार बदल, त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून 10 हजारांचा दंड वसूल केला जाणार. नियमावलीत बदल अंमलात आल्यानंतर नागरिकांना डोळ्यात तेल घालून सरकारी कागदपत्रांमध्ये आधार नंबर नोंदवावा लागणार
‘इन्कम टॅक्स अॅक्ट’च्या कलम 272 अन्वये हा बदल केला जाणार, हा नवीन नियम 1 सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता. चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्या नंबरची पडताळणी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यालाही हा दंड ठोठावला जाणार. कराचा भार टाळण्यासाठी नागरिकांनी चुकीचा आधार नंबर नोंदवू नये, यासाठी सरकारने उचलले हे पाऊल