बऱ्याचदा स्वयंपाक उत्तम येत असतो. मात्र कधी-कधी काहीतरी चूक होते आणि ती सुधारण्यासाठी आपल्याला मार्गच सापडत नाही. म्हणून चूक होऊच नये यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊयात…
१) टोमॅटो पल्प काढण्यासाठी : टोमॅटोचा पल्प पटकन काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. याचा उपयोग टोमॅटो सूप, ग्रेव्ही व ज्युससाठी करता येतो.
२) कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी : कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी कणकेत 2 चमचे गरम केलेले तेल घाला.
३) लिंब ताजे ठेवण्यासाठी : लिंब बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवून चवहीन होतात. त्यासाठी लिंबं निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात.
४) नारळाचे दोन समान भाग करण्यासाठी : जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे त्याला पाण्याची रेघ अर्ध्यातून ओढून नंतर जोरात आपटावे, नारळ तेथूनच तुटेल.
५) नरम व मोकळ्या भातासाठी : तांदुळ शिजवतांना कुकरमध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.