काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचार सुरु होते.
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळल. त्या १९९८ते २०१३ पर्यंत सलग १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. यांच्या जाण्याने दिल्ली आणि देशाच्या राजकारणात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीय. २०१३ साली शीला दिक्षित यांना आपचे अरविंद केजरीवाल यांनी पराभूत केले होते. त्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी त्या संघटनात्मक बांधणीचं काम करत होत्या.