बायोमॅट्रीक तंत्रज्ञानामुळे रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास होणार मदत कशी असेल प्रक्रिया? : रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बायोमॅट्रिक मशिनमधून जावे लागणार आहे. या मशिनवर आपल्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. त्यामुळे गाडी प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर सीट बूक होणार आहे.
कशासाठी: विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करण्यासाठी बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कुठे झाला प्रयोग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. मुंबईतील चार रेल्वे स्थानकावर बायोमॅट्रीक मशीन लावण्यात आली आहे.