विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल. मात्र, राजकीय पक्षात मोठी घडामोडी होताना दिसतेय. काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार भाजपा आणि शिवसेना पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे विरुद्ध पक्षात चिंतेचे वातावरण आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके भाजपाच्या वाटेवर आहेत. त्याचबरोबर अक्कलकोटचे आमदार सिद्धराम मेह्त्रे सुद्धा भाजपात प्रवेश करण्यासाठी सरसावले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघघातील काँग्रेस आमदार विजय गोरे गेल्या सहा महिन्यात पासून भाजपाच्या संपर्कात आहेत असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार रणजित शिंदे यांचे पुत्र भाजपच्या वाटेवर आहेत. त्याचबरोबर उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी, बबनदादा शिंदे, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, रमेश कदम, दत्तात्रय भरणे आणि शिरुरचे राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप कंद यांनी बंडखोरीचा पवित्रा उचलला आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय क्षेत्रात मोठं घोडबाजार होणार हे निश्चित.