भारतीय धावपटू पी. टी. उषा यांना आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क्रिडापटू आयोगाच्या (Athletes Commission) सदस्य बनविण्यात आले आहे. आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क्रिडापटू आयोगाचे अध्यक्षपद 1992 ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या हातोडा फेकपटू उझबेकिस्तानच्या अँड्रे अब्दूवालीयेव्ह असणार आहे. आशियामधली आघाडीची धावपटू ठरणारी 55 वर्षीय पी. टी. उषा या क्रिडापटू आयोगाच्या सहा सदस्यांपैकी एक असणार. आयोगाचे इतर सदस्य ओल्गा रीपाकोवा (कझाकस्तान), वांग यू (चीन), ली हूप वेई (मलेशिया) आणि साद शादाद (सौदी अरब) हे आहेत.
‘पायोली एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणार्या पी. टी. उषा यांनी 1980च्या दशकात अनेक आशियाई स्पर्धा गाजवल्या. त्यांनी सोलमध्ये 1986 साली आशियाई खेळात चार सुवर्ण पदके आणि एक कांस्यपदक जिंकले होते. त्याच्या एक वर्षापूर्वी, जकार्तामध्ये आशियाई स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एक कांस्य पदके पटकावली होती. आशियाई क्रिडापटू संघ (Asian Athletics Association -AAA) ही आशिया खंडामधली मैदानी खेळांसाठीची प्रशासकीय संस्था आहे. त्याचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. ही आशिया खंडामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करते.