स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. SBI सध्या प्रचलित असलेली डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात, याऐवजी वेगळी यंत्रणा आणण्याच्या तयारी दर्शवली आहे. देशभरात सध्या सुमारे 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. डेबिट कार्डलेस देश बनवण्यासाठी ‘योनो’ प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची असेल.
दरम्यान, या प्लॅटफॉर्मद्वारे कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात किंवा कार्ड स्वाईप न करता खरेदी करता येऊ शकते. बँकेने आधीच 68 हजार ‘योनो’ कॅशपॉईंट्स बसवले असून येत्या दीड वर्षात कॅशपॉईंट्सचा हा आकडा 10 लाख करण्याची योजना आहे. येत्या 5 वर्षात डेबिट कार्डचा वापर मर्यादित होईल. तसेच आगामी काळात ग्राहकांच्या खिशातील क्रेडिट कार्ड हा ‘स्टॅण्ड बाय’चा पर्याय म्हणून उपलब्ध राहील.