हार्ले-डेव्हीडसन ही कंपनी आपली वहिली इलेक्ट्रिक बाइक ‘लाइव्हवायर’ भारतात सादर (27 ऑगस्ट) करणार आहे. भारतीय बाजारात या बाइकची किंमत 32 ते 35 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. लाइव्हवायर बाइकमध्ये इलेक्ट्रिक मोटर 105 ‘एचपी’ आणि 116 ‘एनएम’ टॉर्क उत्पन्न करते. ही बाइक 3 सेकंदात 0 ते 1000 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते.
लाइव्हवायर इलेक्ट्रिक बाइकला एसी वॉल सॉकिट पूर्ण चार्ज करण्यासाठी 12.30 तास इतका वेळ लागतो. यानंतर हि बाइक शहरात 235 किलोमीटर आणि हायवेवर 113 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते.
● या बाइकला उत्तम हार्डवेअर सपोर्ट देण्यात आला आहे.
● या व्यतिरिक्त ब्लूटूथ कनेक्टिविटीबरोबर 4.3 इंच टीएफटी डिस्प्ले, एबीएस आणि ट्रँक्शन -कंट्रोल सिस्टमसारख्या सुविधाही आहेत.
● तसेच, या बाइकमध्ये रायडिंग मोड्स असून, यात स्पोर्ट, रोड, रेन, रेंज आणि तीन कस्टम मोड्सचाही समावेश आहे.