सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या टॅवेरा गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर सकाळी इंदापूर जवळच्या वरकुटे फाट्यावर मोठा आपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले आहेत. शिंदे यांच्या तवेरा गाडीने डंपरला पाठीमागून धडक दिली.
दरम्यान, आनंद शिंदे अपघातात जखमी झाले असून त्यांना इंदापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.