मुंबई : वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी ह्या उद्देशाने लोअर परळ येथील गिरणगाव कामगार वस्ती म्हणुन ओळख असणार्या डिलाईरोड भागातील गोवर्धन ५०८/बी. इमारतीमध्ये वास्तव्यास असलेले वृत्तपत्र विक्रेता श्री.जीवन विठोबा भोसले (याच्या) घरी यावर्षी पुस्तक ग्रंथालयाचा देखावा उभा करण्यात अाला आहे. बुद्धीची देवता गणपती बाप्पा या ग्रंथालयात विराजमान झाले आहेत. हा ज्ञानरुपी देखावा गणेश चतुर्थी पासुन गौरी विसर्जनाच्या दिवसापर्यंत राहणार आहे .
अंदाजे तीन लाखा पेक्षा जास्त रुपयांची पुस्तके (साहित्य खजाना) या ग्रंथालयरुपी देखाव्यात ठेवण्यात अाली आहेत. गणेश भक्तांना ही पुस्तके येथे वाचता येतील व ५० टक्क्यांपेक्षा जास्त सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी ही करता येत आहेत. पुस्तकांपासून बनलेला हा सुंदर देखावा श्री. अनिल बने यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आलेला आहे. या देखाव्यात गणपती बाप्पा (शाडुच्या मातीची मुर्ती) ही पुस्तक अथवा वर्तमानपत्र वाचतांना तुम्हाला पाहता येईल.
हा देखावा संपुर्णपणे इको फ्रेंडली असुन यासाठी कागद, पुठ्ठा व लाकडी साहित्य वापरण्यात अाले अाहे. मराठी भाषा टिकावी, वृद्धिंगत व्हावी व अाजच्या तरुण पिढीला वाचनाचे महत्व कळावे व वर्तमानपत्र वाचल्याने कोणकोणते फायदे होतात हा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून केला गेला अाहे. या वर्षी भोसले कुटुंबियांच्या गणपतीला २१ वर्ष पुर्ण होत असून गेल्या वर्षी २०१८ साली इकोफ्रेंडली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आकर्षक सजावटीसाठी उत्तेजनार्थ बक्षिस ही मिळाले अाहे.
पुस्तके, वर्तमानपत्रे का वाचावीत हे दर्शविणारे प्रवेशद्वार भक्तांचे लक्ष वेधून घेणार अाहे.
लहान मुलांना वाचनाची अावड निर्माण व्हावी म्हणुन साटम उद्योग समुहाच्या वतीने येथे काही पुस्तके लहान मुलांना विनामुल्य देण्यात येणार अाहेत. हा देखावा अापण जरुर पहावा असे भोसले परिवाकडून वतीने अापल्या सर्वांना सस्नेह निमंत्रण देण्यात येत आहे.