शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष तथा युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना जवळ करत मेटे यांच्या धमकीला दुर्लक्षित केले . दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मस्के यांच्यासह जि.प सदस्य अशोक लोढा , विजयकांत मुंडे यांनी भाजपात प्रवेश केला.चार पैकी तीन सदस्य भाजपात गेल्याने आमदार मेटेंकडे भारत काळे हे एकमेव सदस्य होते . बुधवारी मुंबई येथे त्यांनी देखील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.एकमेव उरलेल्या जिल्हा परिषद सदस्याने देखील भाजपात प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. विनायक मेटेंना मोठा धक्का बसलेला आहे.या प्रवेशावेळी आ.सुरेश धस , राजेंद्र मस्के, विजयकांत मुंडे,दशरथ वनवे यांची उपस्थिती होती.