गणेशोत्सव अत्यंत आनंदाने आपल्याकडे साजरा होत आहे आणि या सणांचे औचित्य साधतबाल गोपाल मित्र मंडळात आरोग्य जागर बाल गोपाल मित्र मंडळात आरोग्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जय प्रकाश नगर येथे आयोजित या कार्यक्रमात टीम परिवर्तनचे कार्यकर्ते बालाजी सगर यांनी उपस्थित सर्वांना आरोग्यविषयक महत्त्वाच्या शासकीय योजना, आर्थिक मदत कशी मिळवावी, आरोग्य संदर्भात आपले हक्क आणि अधिकार यांची माहिती दिली.
यावेळीं मंडळाचे अध्यक्ष रोहित भोसले यांनी देखील उपस्थितांशी संपर्क साधला. गरजेच्या वेळी आरोग्यविषयक साधनांची किंवा यंत्रणांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. रक्तदान आणि अवयवदान संदर्भात देखील यावेळीं माहिती देण्यात आली. टीम परिवर्तनचे सर्व उपक्रम लोकाभिमुख करण्याचा आमचा मानस असतो त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना भेटी देवुन नागरिकांना उपयुक्त माहिती देण्याचा आमचा मानस आहे असे टीम परिवर्तनचे कार्यकर्ते तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले.