नवी मुंबई – एमपीएससीची तयारी प्रश्नपत्रिकेच्या सरावातुन व्हावी ह्या हेतुतुन लक्ष्य अॅकडमीने विद्यार्थ्यांसाठी एक ‘टेस्ट सिरीज उपक्रम हाती घेतला आहे.राज्यसेवा,पीएसआय,एसटीआय,एएसओ आणि इतर स्पर्धा परिक्षांकरता हा उपक्रम महत्वाचा असल्याचे लक्ष्य अॅकडमीद्वारे सांगण्यात आले.ह्या उपक्रमात होणा-या सरावादरम्यान सहा महिन्यांत विद्यार्थ्यांकडून तब्बल दीडशे प्रश्नपत्रिका सोडवण्यात येणार आहेत.तसेच दहा हजार प्रश्न व त्यांचे विश्लेषण याद्वारे विद्यार्थ्यांना सांगण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांच्या शंकांचे निरसन होण्यासाठी युट्युबच्या माध्यमातुनही तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या स्टेट बोर्ड व एनसीआरडी ह्यांच्या संदर्भ पुस्तकांवरही अडीच हजार प्रश्न व चालु घडामोडींवर १० प्रश्नसंच असणार आहेत. ह्या उपक्रमांची सुरुवात लक्ष्य अॅकडमीच्या विविध केंद्रावर दिनांक १६ सप्टेंबर पासुन संपुर्ण महाराष्ट्रात घेण्यात येणार आहेत.तसेच ह्या सराव परीक्षेचा कालावधी सहा महिने राहणार आहे.विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा व अभायासाचे नियोजन करता यावे,म्हणुन हा सराव परीक्षेचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगण्यात आले.