राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय ‘स्व. कल्पना व्यवहारे’ उत्कृष्ट वाङ्ममय पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव आहे. ,पंधरा हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक 15 सप्टेंबर 2019 रविवार रोजी , दुपारी 4 वाजता ,नरहर कुरुंदकर सभागृह ,पीपल्स महाविद्यालय, येथे करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्रदान सोहळ्याला संस्कारभारतीचे पश्चिम क्षेत्राचे सहप्रमुख अजय देशपांडे, विदर्भ प्रांत महामंत्री आशुतोष अडोणी आणि देवगिरी प्रांताचे कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्काराच्या निमित्ताने शेषराव मोरे यांचे ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.