स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फिफा पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलर ऑफ द इयरचा पुरस्कार रेकॉर्ड सहाव्यांदा जिंकला. मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012 आणि 2015 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. तर, मागील वर्षी क्रोएशियाच्या लुका मोडेरिचने हा पुरस्कार जिंकला होता.
सर्व विजेत्यांची यादी अशी
● सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू : लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/ बार्सिलोना)
● सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : मेघन रॅपिनो (यूएसए/ रिजन एफसी)
● सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक : अॅलिसन बेकर (ब्राझील/ लिवरपूल)
● सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर : साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/ एटलेटिको मैड्रिड)
पुरुषांचा वर्ल्ड 11 वर्षाचा संघ : अॅलिसन बेकर, सर्जिओ रामोस, व्हर्जिन व्हॅन डिजक, मॅथिज डी लिग्ट, मार्सेलो, लुका मॉड्रिक, फ्रेन्की डी जोंग, इडन हजार्ड, लिओनेल मेस्सी, कीलियन एम्बाप्पे, आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. महिला वर्ल्ड 11 संघ : साड़ी वान वेनेंदल, लुसी ब्रॉन्ज, वेंडी रेनार्ड, निला फिशर, केली ओ’हारा, अमैंडा हेनरी, जूली एर्त्ज़, रोज लावेले, मार्ता, एलेक्स मॉर्गन आणि मेगन रेपिनो.
● पुरुष प्रशिक्षक : जर्गन क्लोप (लिव्हरपूल)
● महिला प्रशिक्षक : जिल एलिस (यूएसए)
● पुस्कास अवॉर्ड सर्वोत्कृष्ट गोल : डॅनियल झेझोरी
● फेअर-प्ले पुरस्कार : मार्सेलो बिल्सा आणि लीड्स युनायटेड