आता रेल्वेतून प्रवासादरम्यान आपले सामान चोरी झाल्यास तुम्हाला FIR दाखल करता येणार. सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) प्रवासी आणि त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी घेतला निर्णय. ऑक्टोबरपासून प्रवाशांना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जीआरपीने यासाठी एक खास अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून धावत्या रेल्वेमध्ये एखादा चोरीचा प्रसंग घडल्यास ट्रेन न थांबवता मोबाइल अॅपच्या माध्यमातून एफआयआर दाखल करता येणार. तसेच जीआरपीने केलेल्या सहकार्याचा अनुभवही प्रवासी या अॅपवर नोंदवू शकतात.