भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ‘एक्झिट पोल’ वर बंदी : हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर या मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहापर्यंत माध्यमांवर ‘मतदारांचा कौल'(एक्झिट पोल) सांगणाऱ्या कार्यक्रमांवर भारतीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.
निवडणुका : महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश या 17 राज्यांमधील 52 विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत.