विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचा निकाल उद्या (दि. 24) लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात पुन्हा महायुती सत्तेत येणार का आघाडी? हे पाहणे उद्या औत्सुक्याचे ठरणार आहे.
कल कधी कळतील?
● विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे.
● मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल.
● त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळेल.
● मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.