भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आजच संपल्यामुळे सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा कारभार सांभाळणार आहे.
बीसीसीआयची नवी टीम
● सौरव गांगुली बीसीसीआयचा 39वा अध्यक्ष ठरला आहे.
● केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहणार आहे.
● उत्तराखंडचे महिम वर्मा नवे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज यांनी संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
गांगुलीला अवघ्या 10 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असला तरी त्याला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव असल्यामुळे तो क्रिकेटची विस्कटलेली घडी पुन्हा बसवतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.