जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम हे भारतात उभारलं जात आहे. जानेवारी २०२० पर्यंत अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचं बांधकाम पूर्ण होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मैदानात भारत विरुद्ध जागतिक-११ असा टी-२० सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.
मोटेरा नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात भारताची शेवटची वनडे मॅच २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध झाली होती. यानंतर या स्टेडियमच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली. सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सर्वाधिक ९० हजार प्रेक्षक बसू शकतात. तर कोलकात्याचं ईडन गार्डन ६६,००० प्रेक्षक क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. १८५३ साली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड बांधण्यात आलं होतं.