आभा परिवर्तनवादी संस्थेचा ६वा वर्धापनदिन बरोबर यावर्षी दिवाळीच्या दिवशी आला मग दिवाळी आणि वर्धापनदिन दोघांचे औचित्यसाधून २७ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८ ते १० यादरम्यान महा बीच क्लीन-अप आयोजित करण्यात आले होते. त्यात ५० पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. तसेच महा.अनिस आणि चैतन्य फाऊंडेशन यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता.
आभा परिवर्तनवादी संस्थेचा ६वा वर्धापनदिनचा मुख्य कार्यक्रम २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर २०१९ रोजी शांतीवन – नेरे, पनवेल येथे शिबीर आणि सहल स्वरूपात आयोजित केला होता. पाहिल्या दिवसाची सुरुवात सर्व शिबिरार्थी आणि कार्यकर्त्यांची ओळख, विविध कार्यपद्धती (ऍक्टिव्हिटी) घेण्यात आल्या या ऍक्टिव्हिटी द्वारे सांघिक कामगिरी, नियोजन कसे करावे, संवाद आणि एकमेकांबद्दलचा विश्वास अशा अनेक गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या. मग कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन प्रकल्पाला भेट दिली आणि निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारला. त्यानंतर यश सुर्यवंशी यांचे सेन्सिटायझेशन वर्कशॉप सुरू झाले यामध्ये अंधव्यक्तीचे दररोजचे जीवन, सायटेट व्यक्ती कसे मदत करू शकतात व केली पाहिजे आणि टेकनोलॉजिचा कसा वापर करतात याबाबत सर्व सविस्तर माहिती देण्यात आली. महत्वाचे म्हणजे प्रत्येकक्षात आम्हांला खतरनाक शिकायला आणि अनुभवला मिळाले ते असे की ४० मिनिटे आमच्या डोळ्यांवर पट्टी बांधून आम्हांला सांगितल्याप्रमाणे ५ जणांचे गट बनवायला सांगितले इ. आशा विविध गोष्टी करायला सांगितल्या यातून खऱ्या अर्थाने कळून आले की त्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे सेन्सिटायझेशन वर्कशॉप खूप छान पार पडला. मग संवाद आणि गाण्यांची मैफिल भन्नाट रंगली..
दुसऱ्या दिवसाची सुरुवात निसर्गाच्या सानिध्यात मॉर्निंग वॉकने झाली आणि याच मॉर्निंग वॉक करून सर्वजण नवीन ऊर्जेने पुढील कार्यक्रमाची तयारी करायला सुरुवात केली. कार्यक्रमाची सुरुवात ही गायक प्रमोद पवार आणि अमोल दादा या दोघांच्या रंगतदार गाण्यांनी सुरू झाली. या दोघांनी त्यांच्या सुरेल आवाजांनी पूर्ण हॉल बहरून टाकला. त्यांनतर यावर्षी महाराष्ट्रात आलेले अस्मानी संकटकाळी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन मदत केली अशा कार्यकर्त्यांना आभा परिवर्तनवादी संस्थेद्वारे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आपण वर्धापनदिना दिवशी ज्याची आतुरतेने वाट पाहतो तो क्षण आता आला. आभा परिवर्तनवादी संस्था दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थेबाहेरील सामाजिक कार्यकर्त्यांना “युवा एल्गार” आणि “युवा प्रेरणा” असे दोन पुरस्काराने गौरवून त्यांना प्रोत्साहान आणि नवीन काम करण्याची ऊर्जा देण्याचं काम करते. यावर्षी “अलर्ट सिटीझन” संस्थेच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात उत्तम आणि वाखाणण्याजोगे काम करणारे युवा व्यक्तिमत्व संस्थेचे अध्यक्ष निरंजन आहेर दादा यांना “युवा एल्गार” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आणि युवक दशेत ज्यांची दोन पुस्तक प्रकाशित झाली आशा सर्वपरिचित लेखिका अंजली ताई यांना “युवा प्रेरणा” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निरंजन दादा आणि अंजली ताई तुम्हां दोघांचे मनपूर्वक अभिनंदन..
तसेच आभा परिवर्तनवादी संस्था दरवर्षी संस्थेतील भन्नाट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना “सर्वात्कृष्ट कार्यकर्ता” आणि “आयकॉन ऑफ दि इयर” असे दोन पुरस्काराने गौरवून शाबासकीची थाप देते. यावर्षी प्रणित खताते यांना “सर्वात्कृष्ट कार्यकर्ता” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आणि समीक्षा तोडणकर यांना “आयकॉन ऑफ दि इयर” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.