भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला जागतिक ऑलिम्पियन असोसिएशनने ‘ऑली’च्या उपाधीने गौरवले आहे. मेरी कोमने त्यासाठी संघटनेचे आभार मानले. ऑलिम्पिक पदक जिंकण्यासोबत समाजात ऑलिम्पिक मूल्यांना वाव
देण्याकरिता हा सन्मान दिला जातो.
मेरी कोमने आपल्या ट्विटर हँडलवर सर्टिफिकेट पोस्टकरीत लिहिले की, हा सन्मान देण्यासाठी तुमचे आभार.
सहा वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेल्या मेरी कोमला गेल्या महिन्यातील जागतिक अजिंक्यपदस्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. त्यामुळे
मेरी कांस्यपदक वर समाधान मानावे लागले.
मेरी कोमचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील हे आठवे पदक आहे.
तिने
सहा सुवर्ण,
एक रौप्य व
एक कांस्य पदकाची कमाई केली आहे.
इतके पदक जिंकणारी ती एकमेव बॉक्सर आहे.