येत्या काळात लवकरच भारत हा जगातील सर्वाधिक डिग्री धारक असलेला देश बनेल. विविध डिग्र्यांचा मुखवटा चढवून देशातील तरुण तरुणी खूप विश्वासाने भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज आहेत.काहीजण सरकारी अधिकारी बनन्याच्या प्रयत्नात आहेत तर काही नौकरी. पण काहीजण यापलीकडे जाऊन स्वत:च वेगळं अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
डिग्री करण्यामागचं कारण
भारतातील युवक युवती परिक्षा काळात अभ्यास करून व १-२ महिने ट्युशन करून डिग्री मिळवतात आणि स्वत:हा नौकरी पात्र बनवतात. शिक्षणाचा उद्देश आवड म्हणून नाही नौकरी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन सर्व भारतभर पसरलेला आहे. उदा द्यायचे झाले तर अमेरिकेत एम.ए च शिक्षण घेतलं म्हणजे तो फक्त साहित्य विकासासाठी काम करेल , पण भारतात याउलट आहे डीग्री असते वेगळ्याच अभ्यासक्रमात आणि नौकरी वेगळ्याच ठिकाणी.
कमतरता कुठे आहे
आपल्या देशात थेराॅटिकल नाॅलेज वर जास्त भर दिल जाते त्यामुळे पाहिजे तसे कौशल्य विकसित होत नाही. विदेशात पाहिले तर पाठ्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांना कंपनीत नोकरी करण्याची परवानगी दिली जाते. यामुळे त्याला पगार पण मिळतो आणि क्रेडीट पाॅईंट पण. या प्रैक्टिकल कार्यामुळे त्याला पदवी प्राप्त होते आणि त्याचे कौशल्य पण विकसित होतात. पदवी मिळवल्यानंतर त्याला नौकरी जर मिळाली नाही तर तो त्याच्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभारू शकतो.
उद्योगाकडे वळणे का गरजेचे
सगळ्यांना सरकारी नोकरी मिळेल असेही नाही. सध्या स्थिती पाहिली तर सगळीकडे बेरोजगारी जोमाने वाढत आहे. त्यामुळे पदवीधर युवकांना त्यांचा मोर्चा उद्योगाकडे वळवणे फार गरजेचे आहे जेणेकरून रोजगार निर्माण होईल आणि बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. भारतात उद्योगांसाठी सरकारची भूमिका सक्रिय आहे आणि प्रथम प्राधान्य हे उद्योगांना देत असल्याचे दिसते जेणेकरून देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.
डिग्री सोबतच इतर ज्ञान गरजेचे
डिग्री सोबतच इतर ज्ञान असल्याने काम करणे सोपे जाईल आणि गुणवत्तेच्या आधारावर विभक्त आयुष्य जगायला मदत होईल. हा लेख फक्त पदवीधर युवकांना दिशा देण्याच्या हेतूने आणि त्यांचं मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने आहे.
– हनुमंत चव्हाण