राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी उद्या मंगळवारी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच मोठ्या उद्योगसमूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.