कलाविश्वात काम करीत असताना युवक आणि महिला कलाकारांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून कला, संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
दरम्यान, कला संचालनालयाच्या वतीने आयोजित 60 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.