महाराष्ट्राचे कृषी, सहकार,अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे काल पहिल्यांदाच कराड शहरात स्वागत केले. सर्व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी सोबत जाऊन अभिवादन केले.
दरम्यान, याप्रसंगी युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ते उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांचा राज्याच्या विकासाबाबत नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिला. येणाऱ्या काळात राज्याच्या कृषी,सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी विश्वजीत कदम यांच्याकडून भरीव कामगिरी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी दाखविला.