राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी येत्या काळात तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी केले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने आयोजित ‘ उच्च कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याबाबत आज बैठक घेण्यात आली, या बैठकीत मलिक बोलत होते.
दरम्यान, याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार शरद पवार, कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क अध्यक्ष दिलीप बंड, महासंचालक राजेंद्र जगदाळे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महासंचालक प्रशांत गिरबाने आदी मान्यवर उपस्थित होते.