उठा, जागे व्हा!! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका!असा जगाला संदेश देणारे व युवकांचे प्रेरणास्त्रोत, समाज सुधारक , युवा यु ग- पुरुष ‘स्वामी विवेकानंद’ यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकता येथे झाला.त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचे प्रमु्ख कारण म्हणजे त्यांचे सिद्धांत, अलौकिक विचार आणि त्यांचे आदर्श.ज्याचं त्यांनी स्वत: पालन केले आणि भारतासोबतच त्याचा प्रचार विदेशात पण केला.स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करतात.
प्रत्येक देशाचे भवितव्य हे त्यांच्या युवकांवर अवलंबून असते. आज सध्यास्थिती अशी झाली आहे युवकांसमोर नौकरी हे खूप मोठे आव्हान आहे, कारण जागतिक मंदीचा फटका युवकांना बसत असल्याने बेरोजगारी वाढत चाललेली आहे. युवकांना या नैराश्यतून बाहेर पडण्यासाठी विवेक विचार खूप महत्त्वकांशी आहेत युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात व त्यांचे पालन केले पाहिजे.
३१ मे १८९३ रोजी स्वामी अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले.व भगव्या रंगाचा पोशाख चढविला. व भगवा फेटा गुंडाळला भगवत गीता घेवून त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. ११ सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषदसुरु झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. प्रथम ते घाबरले पण धीट मन करून त्यांनी भाषणाला सुरवात केली. “माझ्या अमेरिकन बंधू -भगिनींनो ! या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले. परिषद संपली, पण स्वामींचे कार्य संपले नव्हते. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात व्याख्याने दिली. हिंदूधर्म प्रचारासाठी त्यांनी न्यूयार्क मध्ये अभ्यासवर्ग सुरु केले.अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले.हिंदूधर्म, तत्वज्ञान यांचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. रामकृष्णा नची भविष्या वाणी खरी ठरली! त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले. ! १८९७ साली स्वामी विवेकानंद भारतात परत आले. १मे १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. व लोक सेवेला सुरवात केली. अमेरिकेत असतानाच ते आजारी पडले. नंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. थोडे दिवस विश्रांती घेऊन ते परत अमेरिकेला जावून आले. १९०२ साली त्यांची प्रकृती जास्त बिघडली मठाचे काम त्यांनी दुसर्यावर सोपविले. ४ जुलै १९०२ साली त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
– हनुमंत चव्हाण