मुंबई – लेखक दिग्दर्शक प्रभू राठोड आपल्या आगळ्यावेगळ्या चित्रपट निर्मितीसाठी परिचित आहेत. नववर्षाच्या औचित्यावर प्रभू राठोड दिग्दर्शित ‘सोलापूर गैंगवार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. न्यूज अनकट व पॅराडाईझ शाॅन प्रोडक्शन असलेल्या या चित्रपटात सोलापूरच्या गुन्हेगारी विश्वाची सत्यकथा लेखकानी रचली आहे.
दरम्यान, या चित्रपटात प्रणाली भालेराव, विक्रांत शिंदे, प्रशांत जाधव, राजेंद्र जाधव हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्याप्रमाणे दिग्दर्शकाने या चित्रपटात नवोदित कलाकारांनाही संधी दिली आहे.