विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कमकुवत आर्थिक स्थिती याचबरोबर तोट्यातील शेती, वाढणारे कर्ज व त्यामुळे वाढते आत्महत्याचे प्रमाण यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी दुग्ध व्यवसाय हमखास व शाश्वत उत्पन्नाचे साधन असून दुधाचे उत्पादन प्रतीदिन २ लाखावरुन ५ लाख लिटरपर्यंत वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांना शाश्वत जोड व्यवसायामुळे चांगले उत्पन्न मिळेल. त्यामुळे दुग्धव्यवसायासाठी चालना देण्यात येईल.