माऊंटेड पथकाद्वारे सण- महोत्सवाच्या दरम्यान, मोर्चे आदी प्रसंगी पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसून परिस्थितीवर लक्ष व नियंत्रण ठेवणे शक्य होणार. गर्दीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारी अरेरावी, चोरी आदींवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी ठरेल.
दरम्यान, ‘रायडर’ घोड्यावर स्वार असल्यामुळे उंचावरून गर्दीवर लक्ष ठेवून काही चुकीचे घडत असल्यास तेथे गतीने जाता येईल. पायी चालणाऱ्या ३० पोलिसांइतकी प्रभावी कामगिरी एक अश्वस्वार पोलीस करू शकेल, पुणे, नागपूर आदी शहरातही ‘हॉर्स माऊंटेड युनिट’ सुरू करण्याचा विचार करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.