बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे काम वेगाने करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी उर्वरित निधी बांधकामाची प्रगती तपासून देण्यासंदर्भात व स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहात आज मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, मंदार पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची कोकणवासियांची इच्छा असून त्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही परिषदेमार्फत करण्यात आली.