मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर मोठ्या व्यग्र दैनंदिनीत एका शेतकऱ्याच्या व्यथेची दखल घेतली होती. व्यथित होऊन जीवन संपविण्याच्या तयारीने मुंबईत दाखल झालेले नांदेड जिल्ह्यातील धनाजी जाधव मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या शब्दांमुळे नवी उमेद घेऊन परतले होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आत्मीयतेने दखल घेतलेल्या या शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. जमिनीच्या सातबारावर नोंदी अद्ययावत झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.