उद्योग, प्रकल्पांच्या गरजा लक्षात घेऊन ‘कौशल्य विकास’चे अभ्यासक्रम आखण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.