मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ करिता एकूण ३७३.३५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
‘डीपीसी’मधून उपनगर जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.