राष्ट्रीय दिनी ग्रामपंचायतींमध्ये होणार संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमध्येही वाचन
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय दिनी सामूहिक वाचन होणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यात संविधानविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.