मुंबईच्या विकासात महापालिकेचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. मुंबईच्या विकासात आणि प्रगतीत मुंबई महानगरपालिकेचे मोलाचे योगदान असून, याचे श्रेय महानगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाते असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
मुंबई महापालिका निर्मित वाईल्ड लाईफ मुंबई चित्रफितीचा शुभारंभ व वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.