समाजात अधिकाधिक सकारात्मक कार्य होणे ही काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी. सेवाभावी कार्यकर्त्याला मानसन्मानची अपेक्षा नसते. चांगले काम केल्यावर त्यातून मिळणारा आनंद व आत्मिक समाधान हेच त्याचे बक्षीस असते. आज सर्वच क्षेत्रात नकारात्मकता वाढत असताना समाजसेवी अझिज मक्की यांच्याप्रमाणे अधिकाधिक सकारात्मक कार्य होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
ज्येष्ठ समाजसेवक अझिज मक्की यांच्या समाजसेवा कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंजुमान ए इस्लाम शिक्षण संस्थेच्या वतीने अंजुमनच्या करिमी ग्रंथालय येथे काल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी राज्यपाल बोलत होते.