मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांना महानगरात विविध ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ वाहतुकीची सुविधा मिळतानाच त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रिपेड रिक्षा स्टँड सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, यामध्ये प्रवाशांची सुरक्षितता देखील जपली जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच मुंबईमध्ये अन्य ठिकाणीदेखील अशा प्रकारे प्रीपेड रिक्षा स्टँड उभारण्यात येतील, असे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी सांगितले. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पहिल्या प्रीपेड रिक्षा स्टँडचे उद्घाटन परिवहन मंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले.