पुणे मेट्रो प्रकल्पाला कर्ज पुरवठा करण्यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेसोबत सामंजस्य करार पार पडला. सामंजस्य करारामुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळणार आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ‘फिक्की’च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन राज्यातील उद्योगक्षेत्राच्या विकासाविषयी चर्चा केली. राज्याच्या गरजेनुसार उद्योजकांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास त्यांना क्विक रिस्पॉन्स विंडो उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच त्यांनी एमएमआरडीए आणि युलू (YULU) कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या विद्युत प्रभारीत दुचाकींचे उदघाटन केले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ संभाजी शिंदे उपस्थित होते.