मुंबई विद्यापीठ हे सर्वात जूने विद्यापीठ असून या विद्यापीठामध्ये 700 पेक्षा जास्त महाविद्याललयांचा समावेश होतो. लाखो विद्यार्थी मुंबई विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाचे प्रशासन सुरळीत चालावे आणि विद्यापीठ अद्ययावत व्हावे यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हा महत्वाचा विषय आहे. आशावेळी विद्यापीठामधील कारभारावर एखाद्या राजकीय पुढाऱ्यानी आक्षेप घेणे आणि त्यामुळे विद्यापीठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चालू असलेले प्रशिक्षण थांबवणे ही बाब अतिशय दुर्दैवी असून अभाविप या घटनेचा जाहीर निषेध करते.
दरम्यविन, द्यापीठामध्ये वाढत चाललेला राजकीय दबाव आणि त्यामुळे होणारी विद्यापीठाची बदनामी यावर आज अभाविप कोंकण द्वारे एक निवेदन मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू यांना देण्यात आले. राजकीय भावनेतून विद्यापीठ प्रशासनावर वाढत चाललेला दबाव हा चिंताजनक आहे असे कोंकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी म्हटले तसेच रामभाऊ म्हाळगी येथे सुरू असलेले प्रशिक्षण अर्ध्यावर का बंद करण्यात आले याचे उत्तर देखील कुलगुरुनी जनतेला आणि विद्यार्थ्याना द्यावे असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे चालू असलेले प्रशिक्षण राजकीय दबावापोटी थांबवणे हे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला आहे. विद्यापीठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे घ्यावे याबाबतचे अधिकार संपूर्णपणे विद्यापीठ कुलगुरूंच्या हाती असावेत आणि त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करून विद्यापीठाचे आणि सोबतच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे. विद्यापीठावर वाढत चाललेला राजकीय दबाव वेळीच थांबवावा अन्यथा अभाविपच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागेल, असे पवार यावेळी म्हणाल्या.