ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आज ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. वसंतराव नाईक आर्थिक महामंडळ तात्काळ ३०० कोटीची निधी उपलब्ध करुन यावर स्थानिक पातळीवर अमंलबजावणी करावी अश्या विविध प्रश्नांवर शिष्टमंडळाने मंत्री महोदयांशी चर्चा केली.
दरम्यान, लवकरच भटक्या- विमुक्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील आणि वसंतराव नाईक यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करु असे आश्वासन यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण, छाया राठोड, रितेश पवार, गोविंद राठोड, साधना राठोड, संदीप चव्हाण जिंतूरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.