कामाठीपुरा हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून त्यालगतच ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जेजे हॉस्पिटल, ग्रँट रोड स्टेशन यासारखे महत्त्वाचे भाग आहेत.
दरम्यान, या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेता तिथे व्यापार वृद्धीसाठी मोठा वाव आहे. म्हणूनच कामाठीपुऱ्याचा विकास करून त्याला मुंबईतील सर्वात मोठे व्यापारी केंद्र बनवणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.